जर वीजेचे बिल अचानक 80 कोटी रुपये एखाद्याला आल्यास त्याला धक्काच बसणे स्वाभाविकच आहे. हाच प्रकार महाराष्ट्रातील नालासोपारा येथील एका 80 वर्षीय गणपत नाईक यांच्यासोबत घडला आहे. कारण त्यांनाच 80 कोटीचे वीजेच बिल आल्यानंतर धक्का बसला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. तर MSEDCL यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन वीजेचे बील योग्य करुन दिले.(Mumbai Local Trains: मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार? रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली 'अशी' माहिती)
गणपत नाईक हे लहान मिल चालवतात. पण लॉकडाऊनमुळे त्यांचे कामकज बंदच होते. अशातच दोन महिन्यांचे वीजेचे बिल 80 कोटींहून अधिक आल्याचे पाहून नाईक यांच्यासह घरातील मंडळींना शॉक लागला. नाईक यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे वीजेचे कोटी रुपयांचे आलेले बिल पाहून त्यांचा बीपी वाढला आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नाईक यांचा मुलगा नीरज याने असे म्हटले की, मला वाटले की आम्हाला त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचे वीज बिल पाठवले आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्याची चौकशी केल्यानंतर कळले हे बिल आमचेच आहे. आम्ही घाबरलो सुद्धा कारण वीज मंडळाकडून थकीत बिलांची वसूली सध्या केली जात आहे. पुढे त्याने असे ही सांगितले की, 80 कोटी रुपयांच्या वीज बिलाची बातमी ही सर्वत्र पसरल्यानंतर MSCDL कडून वीज बिलाची रक्कम ठिक करण्यासाठी एका अधिकाऱ्याला पाठवण्यात आले.(Lockdown बाबत खोटी अफवा पसविणा-यांवर कठोर कारवाई होणार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती)
दरम्यान, पीडित गणपत नाईक यांनी असे म्हटले की वीज विभागाकडून अशी चुक कशी होऊ शकते. बिल पाठवण्यापूर्वी ते मीटर तपासून पाहत नाहीत का? असे कसे चुकीचे बिल एखाद्याला धाडले जाऊ शकते असे प्रश्न त्यांनी उपस्थितीत केले आहेत.