प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

कोटक महिंद्र बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारी कॅश वाहनच ड्राईव्हरने पळवली आहे. या वाहनात तब्बल सव्वा चार कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहेत. याप्रकरणी कॅशवाहनच्या चालकावर गुन्हा दाखल केला असून स्थानिक पोलिसांनी शोध सुरु आहे. ही घटना विरार (Virar) पश्चिमकडील बोळीज भागात गुरूवारी रात्रील साडेनऊच्या सुमारास घडली आहे. सध्या पोलिसांना कॅशवाहन सापडली असून आरोपी फरार आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

विरार पश्चिमकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्र बॅंकेत पैसे भरण्यासाठी आलेली कॅशवाहनच आरोपी ड्रायव्हरने गुरुवारी साडे पाच वाजता पळवली आहे. या कॅशवाहनमध्ये 4 कोटी 58 लाख रुपये होते. यातील 28 हजार रुपाये आजूबाजुच्या एटीएममध्ये भरण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेले. दरम्यान, या वाहनातील लोडर आणि बॉडीगार्ड खाली उतरताच ड्राईव्हर कॅशवाहनसह तेथून पळून गेला. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस आरोपींच्या शोधात आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हे देखील वाचा- Bank Fraud: विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेची 14 लाख रुपयांची फसवणूक, खोटे दागिने ठेवले गहाण

आरोपीला पकडण्यासाठी वसईचे क्राईम ब्रॅंच पथक, ठाणे येथील पथक अशा टीम बनवल्या गेल्या आहेत. सदर आरोपी ड्रायव्हरची ओळख, घराचा पत्ता. कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे लवकरच या आरोपीला पकडण्यात यश येईल, असाही विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.