Maharashtra Congress State Presiden: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीकडे पाहिजेत हे गुण
Congress | (File Image)

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कितीही नाकारले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ( Maharashtra Congress State Presiden) मीच आहे असे सांगितले तरीही या पदाबाबत सुरु असलेल्या चर्चा थांबायचे नाव घेताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ( Congress State Presiden) पदाचा बाळासाहेब थोरात राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा या पदावर आणखी कोणी असो या पदावर (Congress Presiden) असलेल्या व्यक्तिमत्वाकडे काही गोष्टींची आवश्यक्ता नक्कीच आहे. तरच आजच्या अवस्थेतून काँग्रेस पक्षाला बाहेर काढण्यास यश येऊ शकते. अन्यथा काँग्रेस अधिकच गर्तेत राहू शकते.

अश्वासक चेहरा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या अश्वासक चेहऱ्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन हा चेहरा सर्वमान्य असायला हवा. राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबिसी कोट्यातील आरक्षण हे दोन मुद्दे सध्या राज्याच्या राजकारणात कळीचे ठरले आहेत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा यासह समाजातील विविध प्रवाहांची जाण असलेला सर्वमान्य चेहरा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून आवश्यक आहे.

रोखठोक आणि निर्णय क्षमता

आतापर्यंत काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे पद द्यायचे असेल तर संबंधित व्यक्ती काँग्रेसची निष्ठावान आणि त्यातही गांधी कुटुंबीयांच्या निकटवर्तीय असायला हवी. असा एक अलिखीत नियम काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळापासून आहे. हा नियम इतका कटाक्षाने पाळला जातो की, एकवेळ व्यक्ती कितीही निष्ठावन असेल आणि गांधी घराण्याशी तिककी निकटवर्तीय नसेल तर ती प्रदीर्घ काळ पदापासून दूर राहू शकते. काँग्रेसला या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन कार्यक्षम व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवायला हवे. (हेही वाचा, Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता; नव्या चेहऱ्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा)

पक्षांतर्गत गटातटापलीकडची दृष्टी

काँग्रेसला काँग्रेसच पराभूत करते असे एक वचन खुद्द काँग्रेसमध्ये प्रसिद्ध आहे. काँग्रेसमध्ये गटातटाचे इतके प्रयत्न केले जात की, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी गमतीने म्हटले होते की, काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होण्या आगोदरपासूनच त्याला परत पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. गटातटाचे राजकारणच काँग्रेसला आजवर मारक ठरले आहे.

सर्वासमान्य कार्यकर्त्याला संधी

काँग्रेस पक्षाला शतकाची परंपरा आहे. देशातील सर्वात जुना असलेला हा पक्ष तळागाळात पोहोचला आहे. परंतू, काळाच्या ओघात काँग्रेसमध्ये दरबारी राजकारण सुरु झाले. जिल्हा, प्रांत ही काँग्रेस नेत्यांची सुबेदारी निर्माण झाली. त्यातून ठराविक घराण्यांकडेच सत्ताकेंद्र निर्माण झाले. आता ही स्थिती बदलण्याची वेळ आली आहे. काँग्रेस विचाराचा पक्का आणि सर्वासामान्य कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या नेत्यालाच काँग्रेस प्रदेशाध्य पद दिल्यास पक्षाला फायदा होऊ शकतो. (हेही वाचा, Maharashtra Congress State President: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार स्पर्धा, अशोक चव्हाण, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत)

विरोधकांशी सुसंवाद

राज्यास सध्या महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. अशा वेळी काँग्रेसला भाजप हा एकमेव विरोधक पुढे आहे. परंतू, हे चित्र केवळ कागदोपत्री खरे आहे. वास्तवात काँग्रेसमधून शिवसेना, भाजप आणि इतर पक्षात अनेक मंडळी गेली आहे. त्यामुळे विरधी पक्षातील नेत्यांशी चांगला संवाद असेल तर विरोधी पक्षातील नेत्यांचा काँग्रेस प्रवेश घडवून घरवापसी करता येईल. त्याचा पक्षवाढीसाठी फायदा होऊ शकेल.

सध्या काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व खासदार राजीव सातव यांची नावे अधिक आघाडीवर आहेत. यापैकी कोणीही अध्यक्ष झाला तरी संबंधित व्यक्तीमत्वाला वरील गुणांच्या आधारेच काम करावे लागणार आहे. तसे घडले तरच त्याचा गर्तेत अडकलेल्या काँग्रेसला फायदा होऊ शकतो.