Sachin Sawant On BJP: अभूतपूर्व अपयशानंतर मोदींच्या संकल्पनेतून भाजपचा ढॅण्टॅढॅण आत्मनिर्भर टी स्टॉल- सचिन सावंत
Sachin Sawant | (Photo Credits: Facebook)

भाजपच्या (Mumbai BJP) 'आत्मनिर्भर टी स्टॉल' (Atmanirbhar Tea Stall) उपक्रमाची खिल्ली उडवत महाराष्ट्र काँग्रेस ( (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करुन केलेल्या टीकेत सावंत यांनी म्हटले आहे की, मोदींच्या "आत्मनिर्भर पकौडा" (Atmanirbhar Pakoda) प्रकल्पाच्या अभूतपूर्व अपयशानंतर मोदींच्या संकल्पनेतून बेरोजगारांसाठी भाजप प्रस्तुत करत आहे ढॅण्टॅढॅण....."आत्मनिर्भर टी स्टॉल" ( Atmanirbhar Tea Stall).

सचिन सावंत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदी आणि भाजपवार जोरदार निशाणा साधताना दिसतात. या व्हिडओ सावंत यांनी रोजगार, बेरोजगारी आदी मुद्द्यावरुन निशाणा साधताना दिसतात. प्रतिवर्ष दोन कोटी लोकांना दोन कोटी रोजगार देण्याचे अश्वासन देत नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. जाहीर केले त्यानुसार पाठीमागील 6 वर्षांमध्ये 12 कोटी रोजगार त्यांनी लोकांना उपलब्ध करुन द्यायला हवे होते. परंतू, परिस्थिती होती त्याच्या उलट पाहायला मिळाली. जे 12 कोटी रोजार होते तेही नष्ठ झाले. त्यामुळे बेरोजगारांची एक मोठी फौजच या सरकारने निर्माण केल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता; नव्या चेहऱ्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा)

आतापर्यंत यांना बेरोजगारचा पश्न तर यांना सोडवता आलाच नाही. परंतू, त्याउलट नवनव्या योजना मात्र हे नेहमीच देत असतात. या योजनांपैकीच एक योजना होती ती म्हणजे “आत्मनिर्भर पकौडा” योजना. आता या योजनेच्या अभूतपूर्व अपयशानंतर मुंबई भाजप मोदींच्याच संकल्पनेतून पुन्हा एकदा नवी योजना लागू करत आहे. ज्याचे नाव आहे “आत्मनिर्भर टी स्टॉल”, अशा उपहासात्मक शब्दात काँग्रसने भाजपच्या योजनेची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, भाजपच्या आत्मनिर्भर टी स्टॉलला पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गटर गॅस तंत्रज्ञानाचाही जोड देता येईल. हे तंत्रज्ञान वापरुन चालवण्यात येणाऱ्या आत्मनिर्भर टी स्टॉलचे उद्घाटन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करावे, अशी आपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.