Balasaheb Thorat:  बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता; नव्या चेहऱ्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा
Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे सध्या अस्वस्थ असल्याचे समजते. या अस्वस्थतेतून ते आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress) पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. बाळासाहेब थोरात हे आज (4 डिसेंबर 2020) दिल्ली येथे आहेत. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन ते याबबत चर्चा करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, राज्यात सातत्याने होत असलेले नेतृत्वबदलाची चर्चा आणि पक्षातील बदल यामुळे थोरात हे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

बाळासाहेब थोरात हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील ताकदवान नेते आहेत. त्यांच्याकडे विधिमंडळ गटनेतेपद, महसूल मंत्रीपद आणि त्याचसोबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही आहे. त्यामुळे राज्यात पदांचे विकेंद्र करण करावे. तसेच, नेतृत्वात फेरबदलही करावा अशी मागणी होत आहे. त्यासाठी राज्यातील काही नेते दिल्लीत जाऊन हायकमांडकडे लॉबिंग करत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे थोरात हे नाराज असल्याचे समजते.

थोरात यांनी या आधीही दोन वेळा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्याबबत हायकमांड काय निर्णय घेणार याबाब उत्सुकता आहे. (हेही वाचा, Maharashtra Congress State President: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार स्पर्धा, अशोक चव्हाण, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत)

दरम्यान, थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यास त्या ठिकणी कोणाची वर्णी लागणार याबाबतही उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षातून राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आदी नेत्यांची नावे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चेत आहेत. त्यामुळे हायकमांड नेमके कोणाच्या नावाला पसंती यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.