Nitin Gadkari | Twitter/ ANI

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठीचे आज मतदान सुरू झाले आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संमिश्र प्रतिसादामध्ये मतदानाला सुरूवात झाली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज (21 ऑक्टोबर) दिवशी मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाबद्दल आशा व्यक्त केली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विक्रमी मतांनी विजय होईल. असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत. इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चे सारे अपडेट्स

देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना नितीन गडकरी म्हणाले, ' राज्यातील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीने केलेले काम पाहता त्याचं परिवर्तन मतांमध्ये होऊ शकते. तसेच विक्रमी मतांनी ते जिंकून येऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात शिवसेना, भाजप, रिपाई आणि मित्रपक्ष यांची महायुती आहे. 288 जागांपैकी शिवसेना 124, भाजपा 150 तर इतर 14 जागांवर लढणार आहे. इथे पहा लाईव्ह अपडेट्स 

ANI Tweet  

महाराष्ट्रात 288 जागांवर आज विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्या अस्तित्त्वामध्ये असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9नोव्हेंबर दिवशी संपणार आहे.