-महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून 13 मंत्र्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली आहे. 

-अतुल सावे यांनी महाराष्ट्राचा राज्यमंत्री म्हणून घेतली शपथ -औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवार 

-श्री. संजय  उर्फ बळा भेगडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली-भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस -परिणय फुके यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ -राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.    

-अविनाश महातेकर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ -रिपाईचे सरचिटणीस पद सांभाळात आहेत  

- योगेश सागर यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ -चारकोप मतदारसंघातून भाजपचे आमदार

-डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ-शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून कामगिरी -'शिव जल क्रांतीच्या' माध्यमातून उस्मानाबाद येथे काम

-डॉ. अशोक रामाजी उईके यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ -2014 मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून विजयी झाले होते. 

-डॉ. सुरेश खाडे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ-विस्तारासाठी 10-2-1 असा फॉर्म्युला, भाजप-10, शिवसेना-2 आणि रिपाई-1 -डॉ. अनिल बोंडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ 

-भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ -राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ -डॉ. संजय कुटे यांनी घेतली शपथ

-राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात -मुंबईतील राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची उपस्थिती   

Maharashtra Cabinet Expansion 2019:  राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युतीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर आज (16 जून) बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा होणार असून सकाळी 11 वाजता मंत्री आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. तर राजभवनात आज हा नव्या मंत्र्यांचा शपतविधी पार पडणार आहे. काल (16 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारिख सांगितली. त्यामुळे आता सर्व जनतेचे लक्ष मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते याकडे लागले आहे.

नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सोमवार पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी नव्या लोकांना मंत्रिमंडळात संधी देताना, भाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल. यात राधा कृष्ण विखे पाटील आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची जागा निश्चित असल्याचे समजते. तसेच रिपाई म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तर्फे मंत्रिमंडळात एक नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपाई पक्षाचे सचिव अविनाश महातेकर (Avinash Mahatekar) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या चर्चांची पुष्टी करत स्वतः रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ही माहिती दिली आहे.

(मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू)

या लोकांचा होऊ शकतो समावेश –

>औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजप आमदार अतुल सावे

>मोर्शी भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे

>रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर

>अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक

या लोकांना मिळू शकतो डच्चू -

राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोली पालकमंत्री अंबरीश आत्राम

काही दिवसांपूर्वी वित्त व व्यवस्थपन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिमंडळातील विस्ताराबाबत माहिती दिली होती. गृहमंत्री व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचा उमेदवार तर कॅबिनेट मंत्रिपदांसाठी मित्रपक्षाचे सदस्य अशी वर्गवारी निश्चित करण्यात आली होती