युतीच्या जागावाटपात शिवसेना पक्षाच्या वाट्याला आलेल्या 124 मतदारसंघांची नावे
Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) झाली. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपही नक्की झाले. युतीच्या जागावाटप सूत्रानुसार भाजप मोठा भाऊ ठरला असून शिवसेनेकडे छोट्या भावाजाची जबाबदारी आली आहे. त्यानुसार भाजप (BJP) 164 जागा लढवणार आहे. तर, शिवसेना (Shiv Sena) 124 जागा लढवणार आहे. समसमान (144-144) जागावापटपाचा आग्रह धरलेल्या शिवसेनेला अखेर 124 जागांवर समाधान मानावे लागले आहे. युतीत लढावे लागल्याने पक्षातील अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे बंडाळीची शक्यताही वाढली आहे. अर्थात ही भीती शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपमध्येही आहे. जाणून घ्या युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आलेले 124 मतदारसंघ.

शिवसेना लढवणार असलेले मतदारसंघ

1. अक्कलकुवा

2. धुळे शहर

3. चोपडा

4. जळगाव ग्रामीण

5. एरंडोल

6. पाचोरा

7. बुलढाणा,

8. सिंदखेडराजा

9. मेहकर

10. बाळापूर

11. रिसोड

12. बडनेरा

13. तिवसा

14. अचलपूर

15. देवळी

16. ब्रह्मपूरी

17. वरोरा

18. दिग्रस

19. हदगाव

20. नांदेड उत्तर

21. नांदेड दक्षिण

22. लोहा

23. देगलूर

24. वसमत

25. कळमनुरी

26. परभणी

27. गंगाखेड

28. घनसावंगी

29. जालना

30. सिल्लोड

31. कन्नड

32. औरंगाबाद मध्य

33. औरंगाबाद पश्चिम

34. पैठण

35. वैजापूर

36. नांदगाव

37. मालेगाव बाह्य,

38. कळवण

39. येवला

40. सिन्नर

41. निफाड

42. दिंडोरी

43. देवळाली

44. इगतपूरी

45. पालघर

46. बोईसर

47. नालासोपारा

48. वसई

49. भिंवडी ग्रामीण

50. शहापूर

51. भिंवडी पूर्व

52. कल्याण पश्चिम

53. अंबरनाथ

54. कल्याण ग्रामीण

55. ओवळा-माजिवडा

56. कोपरी-पाचपाखाडी

57. मुंब्रा-कळवा

58. मागाठाणे

59. विक्रोळी

60. भांडुप पश्चिम

61. जोगेश्वरी पूर्व

62. दिंडोशी

63. अंधेरी पूर्व

64. चांदिवली

65. मानखुर्द-शिवाजीनगर

66. अणुशक्ती नगर

67. चेंबूर

68. कुर्ला (

69. कलीना

70. वांद्रे पूर्व

71. धारावी

72. माहिम

73. वरळी

74. शिवडी

75. भायखळा

76. मुंबादेवी

77. कर्जत

78. उरण

79. अलिबाग

80. श्रीवर्धन

81. महाड

82. जुन्नर

83. आंबेगाव

84. खेड आळंदी

85. पुरंदर

86. भोर

87. पिंपरी

88. संगमनेर

89. श्रीरामपूर

90. पारनेर

91. अहमदनगर शहर

92. बीड

93. लातूर ग्रामीण

94. उमरगा

95. उस्मानाबाद

96. परांडा

97. करमाळा

98. माढा

99. बार्शी

100. मोहोळ

101. सोलापूर शहर मध्य

102. सांगोले

103. कोरेगाव

104. कराड उत्तर

105. पाटण

106. दापोली

107. गुहागर

108. चिपळूण

109. रत्नागिरी

110. राजापूर

111. कुडाळ

112. सावंतवाडी

113. चंदगड

114. राधानगरी

115. कागल

116. करवीर

117. कोल्हापूर उत्तर

118. शाहूवाडी

119. हातकणंगले

120. शिरोळ

121. इस्लामपूर

122. पळूस-कडेगाव

123. खानापूर

124. तासगाव-कवठेमहांकाळ

(हेही वाचा, शिवसेना पक्षाकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी)

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.