शिवसेना पक्षाकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी
Shiv Sena | (Photo Credits: PTI)

Maharashtra Assembly Elections 2019: भारतीय जनता पक्षाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच पाठोपाठ शिवसेना (Shiv Sena) पक्षानेही आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी (Assembly Elections Shiv Sena Candidates List) जाहीर केली आहे. या यादित अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. भाजप शिवसेना युतीत भाजप 165 जागा लढवणार आहे. तर शिवसेना 124 जागा लढवणार आहे.  उमेदवार यादी जाहीर होताच दोन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील काही नाराजांनी तर थेट आपल्या पदांचा राजीनामा दिल्याचे प्रकार घडले आहेत.

शिवसेना  उमेदवारांची 70 उमेदवारांची पहिली यादी

1. नांदेड - राजश्री पाटील

2. मुरुड - महेंद्र दळवी

3. हाडगाव - नागेश पाटील अष्टीकर

4. मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ

5. भायखळा - यामिनी जाधव

6. गोवंडी - विठ्ठल लोकरे

7. एरंडोल पारोळा - चिमणराव पाटील

8. वडनेरा - प्रीती संजय

9. श्रीवर्धन - विनोद घोसाळकर

10. कोपर पाचपाखाडी - एकनाथ शिंदे

11.वैजापूर - रमेश बोरनावे

12. शिरोळ - उल्हास पाटील

13. गंगाखेड - विशाल कदम

14. दापोली - योगेश कदम

15. गुहागर - भास्कर जाधव

16. अंधेरी पूर्व - रमेश लटके

17. कुडाळ - वैभव नाईक

18. ओवळा माजीवाडा - प्रताप सरनाईक

19. बीड - जयदत्त क्षीरसागर

20. पैठण - संदीपान भुमरे,

21. शहापूर - पांडुरंग बरोला

22. नागपूर शहर - अनिलभैय्या राठोड

23. सिल्लोड - अब्दुल सत्तार

24. औरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाट

25. अक्कलकुवा - आमिशा पाडवी

26. इगतपुरी - निर्मला गावित

27. वसई - विजय पाटील

28. नालासोपारा - प्रदीप शर्मा

29. सांगोला - शब्जी बापू पाटील

30. कर्जत - महेंद्र थोरवे

31. घनसंगवी - डॉ.हिकमत दादा उधन

32. खानापूर - अनिल बाबर

33. राजापूर - राजन साळवी

34. करवीर - चंद्रदीप नरके

35. बाळापूर - नितीन देशमुख

36. देगलूर - सुभाष सबणे

37. उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले

38. दिग्रस - संजय राठोड

39. परभणी - डॉ. राहुल पाटील

40. मेहकर - डॉ. संजय रेमुलकर

41. जालना - अर्जुन खोतकर

42. कळमनुरी - संतोष बांगर

43. कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर

44. औरंगाबाद (पश्चिम) - संजय शिरसाट

45. चांदगड (कोल्हापूर) - संग्राम कुपेकर

46. वरळी - आदित्य ठाकरे

47. शिवडी - अजय चौधरी

48. इचलकरंजी - सुजीत मिकानेकर

49. राधानगरी - प्रकाश आबिटकर

50. पुरंदर - विजय शिवतारे

51. दिंडोशी - सुनील प्रभू

52. जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वायकर

53. मागाठणे - प्रकाश सुर्वे

54. गोवंडी - विठ्ठल लोकारे

55. विक्रोळी - सुनील राऊत

56. अणुशक्ती नगर - तुकाराम काटे

57. चेंबूर - प्रकाश फतारपेकर

58. कुर्ला - मंगेश कुडाळकर

59. कलिना - संजय पोतनिस

60. माहीम - सदा सरवणकर

61. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील

62. पाचोरा - किशोर पाटील

63. मालेगाव - दादा भुसे

64. सिन्नर - राजाभाऊ वाजे

65. निफाड - अनिल कदम

66.देवळाली - योगेश घोलप

67. खेड - आळंदी - सुरेश गोरे

68. पिंपरी चिंचवड - गौतम चाबुकस्वार

69. येवला - संभाजी पवार

70. नांदगाव - सुहास खांडे

शिवसेना उमेदवारांची पहिली यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

(हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शिक्कामोर्तब)

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.