BJP Candidates First List For Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण-पश्चिम, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोथरुड, शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे. शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP) युती झाल्याची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वावरे केली. मात्र, युती करुनही दोन्ही पक्षांनी जागावाटपाचा मुद्दा नेमका कसा सोडवला याबाबत सांगितले नव्हते. आता तर भाजपने थेट उमेदवार यादीच जाहीर केली आहे.
भाजप उमेदवार यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिल्या यादीतील नावे इथे पाहा
भाजपची पहिली यादी काही महत्त्वाची नावे
नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कोथरूड - चंद्रकांत पाटील
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
कसबा पेठ - मुक्ता टिळक
कराड दक्षिण - अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)
बेलापूर - मंदा म्हात्रे
विलेपार्ले - पराग अळवणी
जामनेर - गिरीश महाजन
वडाळा (मुंबई) - कालिदास कोळंबकर
पुणे पर्वती - माधुरी मिसाळ
घाटकोपर (प.) - राम कदम
जळगाव जामोद - संजय कुटे
शहादा - राजेश पाडवी
जळगाव शहर - सुरेश भोळे
सिंदखेडा - जयकुमार रावल
धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती बदाणे
अमळनेर - शिरीष चौधरी
चाळीसगाव - मंगेश चव्हाण
माण - जयकुमार गोरे
परळी - पंकजा मुंडे
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
अकोले - वैभव पिचड
राहुरी - शिवाजीराव कर्डिले
औसा - अभिमन्यू पवार
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
एएनआय ट्विट
BJP releases first list for upcoming Maharashtra assembly elections on October 21. Maharashtra CM Devendra Fadnavis to contest from Nagpur South West, BJP Maharashtra Chief Chandrakant Patil to contest from Kothrud & Pankaja Munde to contest from Parli. pic.twitter.com/8hMxbnwxnd
— ANI (@ANI) October 1, 2019
भाजपने पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे जाहीर केली. यात विद्यमान 52 आमदारांवर विश्वास व्यक्त करत भाजपने या आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. यात 12 महिला आमदारांचा समावेश आहे. 12 जागांची आदलाबदल केल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विद्यमान मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांची नावे या यादीत नाहीत.