महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Assembly Election) 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आतापासून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (21 सप्टेंबर) विधानसभा निवडणूकीनंतर सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचसोबत भाजप-शिवसेना युती सरकारने फक्त 36 टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अहमदनगर (Ahmednagar) येथे आजोयित करण्यात आलेल्या मेळावादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला. तर भाजप-शिवसेना युती सरकारने आता पर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. त्याचसोबत शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगितल्याने त्यांचे अधिक हाल झाल्याचे ही पवार यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर युती सरकारवर सुद्धा जोरदार टीका शरद पवार यांनी केली. तर अहमदनर येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप आणि अन्य शक्तींनी येथून निघून जावे असे खडे बोल मेळावादरम्यान पवार यांनी सुनावले आहेत.(Maharashtra Assembly Elections 2019: काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी विभाग प्रभारींची यादी जाहीर)
तर शुक्रवारी शरद पवार यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाजप सरकारवर टीका केली. त्यावेळी पवार यांनी पुलवामासारखा हल्ला आणखी एक हल्ला महाराष्ट्रातील लोकांची दिशाभूल करु शकतो, असे त्यांनी विधान केले आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे आता सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.