Maharashtra Assembly Elections 2019: काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी विभाग प्रभारींची यादी जाहीर
Congress Logo (Photo Credits: Wiki Commons)

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीचा (Assembly Elections) तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. परंतु तरीही राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून आज विधानसभा निवडणूकीसाठी विभाग प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विभाग प्रभारींसाठी मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, आर.सी. खुतनिया, राजीव सातव यांच्या नावांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विदर्भासाठी मुकुल विसनिक, मुंबई विभाग आणि निवडणूक नियंत्रण कक्षाच्या प्रभारी पदासाठी अविनाश पांडे, पश्चिम कोकण विभागासाठी रजनी पाटील, उत्तर महाराष्ट्र आर.सी. खुतनिया यांच्यासह मराठवाड्यासाठी राजीव सातव यांची नियुक्ती केली आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी पहिली 50 जणांची उमेदवारी येत्या 20 सप्टेंबराला करणार जाहीर)

ANI Tweet:

तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 50-50 चा पर्याय निवडला आहे. त्यानुसार दोन्ही पक्ष 125-125 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर 38 जागा या इतर पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशभरात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. याला महाराष्ट्रदेखील अपवाद नाही. सध्या महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी भाजपा आणि शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्याने सध्या महराष्ट्रात कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडलं आहे.