महाराष्ट्रामध्ये येत्या काही तासात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections)ची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सारेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून पहिल्या 5 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. आता त्यांचा मित्रपक्ष कॉंग्रेसकडून येत्या 20 सप्टेंबरला 50 उमेदावारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याबाबत माहिती दिली आहे. Maharashtra Assembly Elections 2019: धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा सह 5 जणांना NCP कडून उमेदावारी जाहीर; शरद पवार यांच्याकडून बीड मध्ये घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 50-50 चा पर्याय निवडला आहे. त्यानुसार दोन्ही पक्ष 125-125 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर 38 जागा या इतर पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशभरात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. याला महाराष्ट्रदेखील अपवाद नाही. सध्या महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी भाजपा आणि शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्याने सध्या महराष्ट्रात कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडलं आहे.
ANI Tweet
Maharashtra Congress President, Balasaheb Thorat: The first list of 50 Congress candidates for Maharashtra Assembly elections will be out by September 20. (file pic) pic.twitter.com/SeZYS0yDGI
— ANI (@ANI) September 18, 2019
एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर करायला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि शिवसेना पक्षाकडून मात्र अद्याप युतीची घोषणा होणं बाकी आहे. महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 दिवशी संपणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यंदा 28 ऑक्टोबरला सुरू होणार्या दिवाळी
सणापूर्वी महाराष्ट्र राज्यातील निवडणूक प्रक्रिया संपवण्याचं आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यानुसार राज्यात निवडणूकांचे आयोजन करण्यात येणार आहे.