Mufti Mohammed Ismail (Photo Credits: Facebook)

मुफ्ती मोहम्मद इस्माईल (Mufti Mohammed Ismail) हे धर्मगुरू मौलाना आणि Jamiat Ulema-e-Hind चे सदस्य 2009 साली पहिल्यांदा मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे गेले. मालेगाव विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी 'तिसरी आघाडी' ची स्थापना करून कॉंग्रेस आणि जनता दलला आव्हान दिलं. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकत 5 वर्षांसाठी मालेगाव महानगरपालिकेची सत्ता सांभाळली. 2009 साली जनसुराज्य शक्ती पार्टी कडून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या मुफ्ती इस्माईल यांनी शेख रशिद (MLA Shaikh Rashid) यांचा पराभव केला. 2014 साली त्यांनी एनसीपीमध्ये प्रवेश केला तेव्हा शेख असिफ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आता 2019 ची विधानसभा निवडणूक महिन्याभरापेक्षा कमी अवधीवर येऊन ठेपली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एमआयएम  (AIMIM) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आपल्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल Latestly सोबत केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत

तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करण्यामागील कारण?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: मला सांस्ककृतिक पार्श्वभूमी आहे. मी Jamiat Ulema-e-Hind समितीचा प्रमुख होतो. 2007 साली शहरातील काही इस्लामिकांनी एकत्र येऊन नेतृत्त्वाच्या अभावामुळे विकासामध्ये अडथळा येत असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावेळेस पर्यायी नेतृत्त्व उभारण्याची गरज ओळखून मी राजकारणात प्रवेश केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी राष्ट्रवादी पक्ष सोडून AIMIM पक्षांमध्ये प्रवेश करण्यामागील कारण?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: ' भगवा दहशतवाद' याबाबत उघडपणे बोलणारे शरद पवार हे पहिले नेते होते. आर आर. पाटील गृहमंत्री असताना हेमंत करकरे यांनी मालेगाव ब्लास्ट प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांना अटक केली. मात्र तिहेरी तलाक कायद्यामध्ये एससीपीने आमची निराशा केली. मात्र अससुद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाक कायद्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता मी AIMIM पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. Maharashtra Vidhan Sabha Elections 2019: भायखळा विधानसभा मतदारसंघातून वारीस पठाण सह MIM पक्षाच्या मुंबईतील 5 उमेदवारांची यादी जाहीर

मुफ्ती इस्माईल सोबत तेलंगणा AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Photo Credits: Facebook)

सुरूवातीला जनसुराज्य पक्ष नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता AIMIM, भविष्यात तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करणार का?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: 2014 पासून भाजपा मला त्यांच्या पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी लोकसभा निवडणूकीचे तिकीट देण्याची ऑफर देखील दिली होती. पण आमच्या विचारसरणी दोन विभिन्न टोकाच्या आहेत.

मालेगावमधील युनूस इसा परिवाराशी तुमचे खास संबंध आहेत, त्यांचा मुलगा अब्दुल मलिक यांना महापौर बनवलं त्यानंतर तुमच्याविरूद्ध निवडणूक लढवत तुमचा पराभव केला. इतकं असूनही मलिक आणि युनुस इसा यांंचा परिवार तुमच्यासोबत आहे, हे कसं काय?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: हे सगळं परिस्थितीवर अवलंबून असतं. मी आमदार झाल्यानंतर युनुस इसा परिवाराने राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शरद पवारांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला, पक्षामध्ये माझी ओळख करून दिली त्यावेळेस अनेकांना माझ्या कामाने, व्यक्तिमत्त्वाने आकर्षित केलं. त्यानंतर मला मालेगावची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळेस युनुस इसा परिवाराला त्याचा त्रास झाला आणि त्यांनी राष्ट्रवादीला अलविदा म्हटलं आणि AIMIM पक्षात प्रवेश केला. मात्र जेव्हा या वेळेस असदुद्दीन यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा युनुस इसा परिवारालादेखील सोबत घेऊन मी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष प्रवेश करत असल्याचं म्हटल आहे.

मुफ्ती इस्माईल, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि युनुस इसा परिवार (Photo Credits: Facebook)

तुमच्या 5 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीकडे  तुम्ही कसं पाहता?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: माझं आमदार म्हणून केलेलं सर्वोत्तम काम म्हणजे घरकुल योजनेअंतर्गत उपलब्ध केलेली 11,520 घरं. यामुळे झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या अनेकांना हक्काची घरं मिळाली. यामधील निम्मी तयार आहेत. शिल्लक घरं लवकरच मिळतील.

आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये तुम्ही निवडून आल्यास तुमच्या समोर काय अजेंडा आहे?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: मालेगावमध्ये सध्या विद्युत आणि पाणी पुरवठा अनियमित आहे. उत्तम रस्ते निर्माण करणं ही शहरातील महत्त्वाच्या गरजांपैकी एक आहे. दोन उड्डाणपूलांसाठी मला राज्य सरकारकडून परवानगी घ्यायची आहे. मालेगावमध्ये नवं इंजिनियरिंग कॉलेज सुरू करायचं आहे तर ग्राम पंचायतीसाठीदेखील 500 कोटीचा निधी द्यायचा आहे.

राजकारणातील घराणेशाही तुम्हंला पसंत नाही, पण तुमचा मुलगा राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसतो. भविष्यात तो निवडणूक लढवणार का?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: काही वेळेस मी कामामध्ये व्यस्त असतो अशावेळेस मी राजकीय कार्यक्रमामध्ये माझ्या मुलाला पाठवतो. मात्र सध्या त्याचे निवडणूक लढवण्याचे कोणतेही इरादे नाहीत.

Jamiat Ulema-e-Hind चे तुम्ही प्रमुख सदस्य आहात. तुमचा जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याचा सरकारच्या निर्णयावर काय भूमिका आहे?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: Jamiat चा विश्वास आहे की जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. कश्मीरचा हा विशेष दर्जा हटवताना काही महत्त्वाच्या गोष्टींना हात लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

मॉब लिंचिंग सारख्या घटना रोजच घडतात, Jamiat ची हा बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक मधील दरी कमी करण्यासाठी कय भूमिका घेणार?

मुफ्ती मोहम्मद इस्माईल: Jamiat ला समाजातील विविध जातीय, धर्मांमध्ये सख्य रहावं अशी इच्छा आहे. यासाठी मुस्लिमेतर लोकांना मदरसा, मशीदीमध्ये आमंत्रित केलं जातं. त्यांना याठिकाणी नेमके कोणते कार्यक्रम होतात हे दाखवलं जातं. यामुळे जातीय तेढ आणि समाजाबद्दल असलेल्या गैर समजुती कमी होतील.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील अत्यंत संवेदनशील मतदार संघ म्हणून ओळखला जातो. सध्याकॉंग़्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातून जनता दल उमेदवार देणार नसून एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात यंदा कशी लढत रंगणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.