MIM MLA Waris Pathan | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक 2019 साठी सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी पासून वेगळ्या झालेल्या एमआयएम पक्षाने आता त्याची यादी जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. नुकतीच एमआयएम पक्षाने मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 5 मुंबई विधानसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघातून वारीस पठाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये एमआयएम अअणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढले होते मात्र आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूकींना समोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एमआयएम एकूण 60 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. एमआयएम पक्षप्रमुख असदुद्दिन ओवेसी यांनी ट्वीटरवरून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करताना आनंद होत आहे,' अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

असदुद्दिन ओवेसी ट्वीट

एमआयएम उमेदवार

कुर्ला विधानसभा मतदारसंघ - ज्ञानू डावरे,

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद सलीम कुरेशी,

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ - शाहवाज सरफराज हुसेन शेख,

भायखळा विधानसभा मतदारसंघ - आमदार वारिस पठाण,

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - अरिफ मोईनुद्दीन शेख

काही दिवसांपूर्वी सोलापूर, पुणे विधानसभा मतदार संघातून 4 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.