Photo Credit- X

Maharashtra Assembly Election 2024: काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल या वाक्यासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) सांगोला विधानसभा (Sangola Vidhan sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील (Deepak Aaba Salunkhe patil) तर शेकपकडून बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) मैदानात आहेत. अत्यंत चुरशीची लढत होत असून, राज्यातील सर्वात मोठ्या काही लढतींपैकी सांगोला विधानसभा मतदारसंघाची ही एक लढत मानली जात आहे. त्यामध्ये शेकापचे बाबासाहेब पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. (Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेना उबाठा गटाला धक्का! आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर; मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर)

शहाजी बापू विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील मैदानात आहेत. शेकापकडून अनिकेत देशमुख मैदानात आहेत. सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघातून शिवसेना युतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना विजय मिळाला होता. शहाजी पाटील यांना 99,464 मतं मिळाली होती. अटीतटीच्या लढतीत ते 768 मतांनी आमदार बनले होते. पाटील यांनी शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता.

3 लाख 29 हजार मतदार

सांगोला विधानसभा मदारसंघात एकूण 3 लाख 29 हजार 48 मतदारसंख्या आहेत. त्यापैकी, 1 लाख 70 हजार 690 पुरुष मतदार असून 1 लाख 58 हजार 353 स्त्री मतदार आहेत.