राज्यभरातील पावसाने जरा विश्रांती घेतलेली आहे. गेल्या काही महिन्यात राज्यातील विविध भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), विदर्भसह (Vidarbha) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाने जरा उसंत घेतली आहे. तरी काल रात्री मात्र मुंबईसह (Mumbai) उपनगरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम मुंबई (West Mumbai), दक्षिण मुंबई (South Mumbai), ठाणे (Thane) या भागात रात्रभर जोरदार पाऊस पडला आहे. तसेच जोरदार पावसासह वेगवान वारे देखील मुंबईत वाहत आहेत. तरी मुंबईतील समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच जोरदार पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतूकीवर (Mumbai Traffic) दिसून येत आहे.
राज्यातील इतर भागात मात्र पावसाने उसंत घेतली आहे. विदर्भातील (Vidarbha) विविध जिल्ह्यात लांब कालवधी नंतर निरभ्र आकाश बघायला मिळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) या भागात सध्या पावसाचा वेग मंदावला आहे. बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.राज्यात कोकणसह (Konkan), पूर्व विदर्भ (East Vidarbha), उत्तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.(हे ही वाचा:- Maharashtra COVID19 Cases: महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1,183 जणांना कोरोनाचा संसर्ग; एकाचा मृत्यू)
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, मुंबईसह (Mumbai) परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. तरी प्रशासनाकडून मुंबईकरांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.