राज्यात येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते सहावी वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा विषय शिकवणे अनिवार्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला आहे. तर महाराष्ट्रात मराठी भाषा शाळांमध्ये शिकवणे सक्तीचे करावे या संदर्भातील कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे सुभाष देसाई आणि वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते.
आज व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वर्षा गायकवाड, सुभाष देसाई आणि बालभारतीचे संचालकांसह महत्वाच्या मंडळींची उपस्थिती दिसून आली. बालभारतीतर्फे मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठीच्या वर्गवार अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्ताबाबतच्या संदर्भातील पूर्वतयारी काय असणार याबद्दल स्पष्ट केले. शिक्षण विभागाकडून आता मराठी भाषा सर्व शाळांसाठी सक्तीची करण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे स्वागत करत वर्षा गाडकवाड आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.(Maharashtra University Exams 2020: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात: मंत्री उदय सामंत यांची माहिती)
राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून #मराठी भाषा #विषय शिकविणे #सक्तिचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आज आढावा घेतला. @Subhash_Desai
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 11, 2020
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी असे म्हटले होते की, अंतिम वर्गाची अंतिम सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी विशेष गुणपद्धती दिली जाईल. पुढील वर्षी ग्रेडिंग सुधारण्यासाठी विशेष परीक्षा पुढल्या वर्षी घेतल्या जातील. मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई विद्यापीठामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यांचे सर्वोत्तम मार्क निवडून ग्रेडिंग ठरवलं जाईल. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार होणार आहे.