Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! क्रूझर दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू
Maharashtra: 8 feared dead, 15 injured in car accident in Nandurbar district (Photo Credit: Twitter)

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात येणाऱ्या ब्राह्मणपुरीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सिंदीदिगर घाटात क्रूझर दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या वाहनातून 30 जण प्रवास करत होते. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास पंधराहून अधिक लोक प्रवास जखमी झाल्याची माहीत समजत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर सिंधी गावाकडे जाणारी क्रूझर गाडी दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गाडीत 30 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. क्रूझर दरीत कोसळण्यापूर्वी प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे. तर, 8 जण ठार झाले असून पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना म्हसावद, तोरणमाळ या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हे देखील वाचा- Tulsi Lake Overflow: मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले

ट्वीट-

याआधी जानेवारी महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन 6 जण ठार झाले होते. यात 5 महिलांचा समावेश होता. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.