Mahaparinirvan Din 2020: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पत्राद्वारे अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन
Chaitya Bhoomi (Photo Credits-Facebook)

Mahaparinirvan Din 2020: देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन येत्या 6 डिसेंबरला साजरा केला जाणार आहे. या महापरिनिर्वाण दिनामित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभुमीवर येतात. मात्र यंदाच्या वर्षात कोरोनाची परिस्थिती पाहता महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी चैत्यभुमीवर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त पत्र पाठवून आंबेडकर यांना अभिवादन करावे असे ही म्हटले आहे.(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डिजिटल माध्यमातून साजरी करावी; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन)

दादर मधील चैत्यभुमीवर 6 डिसेंबर पूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या दिसून येतात. यामध्ये लहानमुलांपासून ते वयोवृद्ध ही आवर्जुन बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहचतात. पण कोरोनामुळे पत्र पाठवण्याचा पर्याय सुचवल्याने आतापर्यंत हजारोंच्या संख्येने पत्र दाखल झाली आहेत. या पत्रांमध्ये उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तेलगूसह विविध भाषांचा समावेश आहे. (Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखली जाते?)

तर विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा  उरक्रम  राबवला जाणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ज्या अनुयायांना चैत्यभुमीवर येणे शक्य नाही त्यांनी पत्राद्वारे त्यांना अभिवादन करावे असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या पत्रावर आपले नाव, पत्ता आणि संदेशासह दादर मधील चैत्यभुमीच्या पत्त्यावर पाठवावे असे ही म्हटले आहे. एकूण कोरोनाची परिस्थिती परिस्थिती पाहता गर्दी न करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.