Mahaparinirvan Divas 2019: भीम अनुयायींसाठी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा अत्यंत खास असतो. 6 डिसेंबर हा दिवस देशभरातील भीम अनुयायींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यंदा देशा-परदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. भारताच्या इतिहासात दलित आणि बौद्ध धर्मीयांसाठी आपलं जीवन वेचणार्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. बाबासाहेबांचे निधन झाल्यानंतर 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला ओळखला जाण्यास सुरूवात झाली. मग जाणून त्यांच्या स्मृतिदिनाला महापरिनिर्वाण दिन का म्हटलं जातं? DR BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 Messages: 63व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे मराठी मेसेजेस आणि WhatsApp Status.
महापरिनिर्वाण म्हणजे नेमकं काय?
बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो.
बौद्ध धर्म सांगतो की, आपल्या आयुष्याचं कर्म हे मृत्यूनंतरही आत्मा किंवा स्पिरीटच्या माध्यमातून पुढे जात राहते. मात्र निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुर्नजन्माचा विषय संपतो. अनेकदा पूर्वायुष्यातील कर्माचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो. त्यामुळे निर्वाण स्थिती मिळवल्याने या कर्माचं ओझं पुढीच जन्मावर राहत नाही.
निर्वाण प्राप्त करणं हे अत्यंत कठीण आहे. जी व्यक्ती सत्त्विक, शुद्ध आयुष्य जगतात त्यांना ही स्थिती प्राप्त करता येते. बौद्ध धर्मियांनुसार गौतम बुद्ध यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले ते मूळ महापरिनिर्वाण आहे. Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2019: 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; पहा वेळापत्रक.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. दिल्ली येथील डॉ. आंबेडकरांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूरात 14 ऑक्टोबर 1956 साली सुमारे 5 लाख अनुयायांनी त्यांना बौद्ध नेते म्हणून स्वीकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी मुंबईतील दादर चौपाटीवर करण्यात आले. यावेळेस बौद्ध धर्माप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. त्यांनी देशातून अस्पृश्यता निर्मुलनाचे काम केल्याने त्यांना बुद्धिस्ट गुरू म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेली जागा चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. बौद्ध धर्मीय आणि भीम अनुयायींसाठी ही जागा पवित्र आहे.