Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2019: 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; पहा वेळापत्रक
रेल्वे सेवा (फोटो सौजन्य-फेसबुक)

अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार 'भारतरत्न' डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din). या दिवशी संपूर्ण भारतात बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते. मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. या पार्श्वभूमीवर मुंबईत येणार्‍या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष 12 अनारक्षित फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच या अनुयायांना शासनाकडून सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येतील अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

या मार्गावर धावतील विशेष गाड्या –

नागपुर ते सीएसएमटी 3 फेर्‍या, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपुर 6 फेर्‍या, अजनी ते सीएसएमटी 1 फेरी, सोलापूर ते सीएसएमटी 2 फेर्‍या धावणार आहेत. नागपूर–मुंबई या महत्वाच्या गाडीसाठी नाशिकरोड, मनमाड, इगतपुरी, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामनगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, कसारा, कल्याण, दादर असे थांबे आहेत.

असे असेल या गाड्यांचे वेळापत्रक –

मुंबईला जाण्यासाठी -

4 डिसेंबर रोजी, 2.35 वाजता नागपूर-मुंबई गाडी प्रस्थान करेल. ही गाडी मुंबईला दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर रोजी दुपारी 2.35 वाजता पोहोचेल.

5 डिसेंबर रोजी दुसरी गाडी सकाळी 7.50 वाजता सुटेल. ही गाडी मुंबईला दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी रात्री 12.10 वाजता पोहोचेल.

5 डिसेंबर रोजीच तिसरी गाडी दुपारी 3.55 वाजता सुटेल. ही गाडी मुंबईला दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी सकाळी 11.35 वाजता पोहोचेल.

5 डिसेंबर रोजी सोलापूर-सीएसएमटी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुटेल, ती सीएसएमटीला रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल.

7 डिसेंबर रोजी सीएसएमटी-सोलापूर ट्रेन रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे.

नागपूरकडे जाण्यासाठी -

6 डिसेंबर रोजी मुंबई-अजनी गाडी सायंकाळी 4.05 वाजता सुटेल. मुंबई-सेवाग्राम सायंकाळी 6.40 वाजता मुंबईहून निघेल. (हेही वाचा: विद्यार्थी दिवस 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो विद्यार्थी दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्व)

7 डिसेंबर रोजी दादर-अजनी गाडी दादरहून मध्यरात्री 12.40 वाजता निघेल. मुंबई-नागपूर गाडी मुंबईहून दुपारी 12.35 वाजता निघेल.

8 डिसेंबर रोजी मुंबई-नागपूर गाडी मुंबईहून सायंकाळी 6.40 वाजता सुटेल. दादर-अजनी गाडी दादरहून रात्री 12.40 वाजता सुटेल.

दादर येथील चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाचे दर्शन घेण्‍यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. यामुळे बेस्ट बस आणि मुंबई लोकल यांच्याकडून ज्यादा गाड्या चालवण्यात येतात.