
Mahaparinirvan Din 2019 Marathi Messages: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीमध्ये निधन झाले. त्यानंतर हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' (Mahaparinirvan Din) म्हणून पाळला जातो. दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने दरवर्षी भीम अनुयायी, बौद्ध धर्मीय त्यांच्या स्मृतिस्थळावर भेट देऊन श्रद्धांजली अर्पण करतात. यंदा 6 डिसेंबर दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. भारतातील अस्पृश्यता, दलितांना मिळणारी दुय्यम वागणूक यामधून समाजातील मोठ्या घटकाला बाहेर काढून शिकण्याची, संघटीत होण्याची आणि संघर्ष करण्याची शिकवण देणार्या या महामानवाला 'महापरिनिर्वाण दिनी' अभिवादन करून सोशल मीडियात व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक स्टेट्स (Facebook Status) यांच्या माध्यमातून अभिवादन करणारे मेसेज शेअर करा आणि पुन्हा त्यांच्या प्रेरणादायी आणि सकारत्मक विचारांचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवा. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे '5' प्रेरणादायी विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!
महापरिनिर्वाण दिन मेसेजेस

माणसाला माणूसपण दाखवणार्या
महामानवाला 'महापरिनिर्वाण दिनी'
कोटी कोटी प्रणाम!

नमन तया देशप्रेमाला,
नमन तया सागराला,
महापुरुषाला….

6 डिसेंबर छप्पन साली
वेळ कशी ती हेरली
दुष्ट काळाने भीमरायाची
प्राणज्योत ती चोरली . . .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
विनम्र अभिवादन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
विनम्र अभिवादन !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
विनम्र अभिवादन !

महाज्ञानाच्या महामानवाला
थोर त्यागी त्या पुज्य गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
जय भीम... जय भीम...
दरवर्षी महापरिनिर्वाण दिन आणि आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत चैत्यभूमीवर भीम अनुयायी एकत्र जमतात. देशाच्या कानाकोपर्यातून येणारा हा जनसागर प्रामुख्याने पांढरे कपडे परिधान करतात तर त्यांच्या हातात निळा झेंडा असतो. यंदाही त्यांच्या सोयीसाठी दादरच्या चौपाटीवर स्वयंसेवक आणि प्रशासन सज्ज आहे.