Dr. BR Ambedkar Marathi Quotes: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी भारत देशाला समता, बंधुता, स्वतंत्र, न्याय ही महत्त्वाची मुल्यंं दिली मात्र त्यासोबतच या देशामध्ये माणसाला 'माणूसपण' देण्याचं मोठं कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंनी केलं आहे. म्हणूनच दरवर्षी 6 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaityabhumi) त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळतो. यंदा 6 डिसेंबर 2019 दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) पार पडणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर आजही भीम अनुयायींना एकत्र ठेवणारा दुवा म्हणजे त्यांचे विचार,साहित्य आहे. 6 डिसेंबर 1956 दिवशी दिल्लीत डॉ. आंबेडकर यांचे निधन झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष एन . शिवराजन यांनी बाबासाहेबाांना श्रद्धांजली अर्पण करताना, 'डॉ. आंबेडकर डेड इज स्ट्रॉन्गर दॅन डॉ. आंबेडकर अलाईव्ह ' म्हणजेच महानिर्वाणाच्या स्थितीत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवंत आंबेडकरांपेक्षा शक्तिमान आहेत. असं म्हटलं आहे. आजही त्यांच्या साहित्यातून त्याची प्रचिती येते. त्यामुळे केवळ भीम अनुयायींसाठी नव्हे तर सर्वसामान्यांनाही प्रगल्भ करतील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे विचार यंदा महापरिनिर्वाण दिनी नक्की शेअर करा. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का साजरी केली जाते?
डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांचे विचार
- अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. R. Ambedkar Quotes| File Photo
- माणसाला दारिद्रयाची नव्हे तर आपल्या दुर्गुणांची लाज वाटायला पाहिजे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- शीला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यंदा बाबासाहेब आंबेडकरांची 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवसाचं औचित्य साधत अनेक भीम अनुयायी दादर येथे पांढर्या वेशभूषेत, निळा झेंडा घेऊन दाखल होतात. यंदा देखील लाखो भीम अनुयायी दाखल होण्याची शक्यता आहे.