देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या नव्या ठिकाणाची नोंद; महाबळेश्वर, ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पर्जनवृष्टीची नोंद
Mahabaleshwar Rainfall | Image only representative purpose (Photo Credit: Twitter)

Maharashtra Monsoon 2019: सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजवर मेघालय (Meghalaya) राज्यातील चेरापूंजी (Cherrapunjee) हे ठिकाण सर्वपरिचीत होते. मात्र, आता या ठिकाणाला पाठिमागे टाकत सातारा ( Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील ताम्हिणी (Tamhini Ghat) येथे सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, ताम्हिणी येथे ५,९५९ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे ५,७६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये दोन नव्या ठिकाणांच्या नावांचा समावेश झाला आहे.

पाऊस पडण्यासाठी भौगोलिक स्थान आणि वातावरणात आवश्यक असणारी पोषक स्थिती उपलब्ध व्हावी लागते. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगा विशिष्ट रचनेत असल्यामुळे पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांसाठी पोषक स्थिती निर्माण होते. ज्यामुळे पाऊस कोसळण्यास मदत होते. या वातावरणाचा अधिक फायदा पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट सातार जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन ठिकाणे आणि परिसराला मिळाला. पाठिमागील दोन आठवड्यांहून अधिक काळ या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि ताम्हिणी या ठिकाणी पावसाच्या नोंदीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

The Weather Channel India ने आपल्य ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतात आता अधिक पर्जन्यवृष्टीच्या ठिकाणामध्ये नव्या दोन ठिकाणांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील महबळेश्वर आणि ताम्हिणी येथे मेघालय राज्यातील चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे १ जून पासून केल्या गेलेल्या नोंदीमध्ये ५ हजार ७६४ मिलीमीटर पाऊस पडल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Update 2019: मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज)

महाबळेश्वरच्या पावसाच्या इतिहासाहमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आजवर सरासरी ४ हजार ९५८ मिमी, तर सप्टेंबरअखेरीस ५ हजार ५३० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेली अनेक वर्षे ही सरासरी थोड्याअधिक प्रमाणात सारखीच राहिली आहे. मात्र, यंदाचा (2019) पाऊस हा नवा उच्चांक नोंदवून गेला. यंदा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ हजार ९६ मिमी पावसाची नोंद झाली. विशेश असे की, गेल्याही वर्षी महाबळेश्वरमध्ये चेरापूंजी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती.