Maharashtra Monsoon Update 2019: मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज
Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

मागील काही दिवसांपासून होत असलेल्या तुफान पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा यांच्या सह राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात पावसाने मुंबईसह उपगनरांमध्ये धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम  वाहतुकीच्या मार्गांवरही झाला आहे. राज्यातील पूरपरिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून त्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. (Sangli Flood: सांगली येथील ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर)

यातच कोकणातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. (महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज)

ANI Tweet:

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे हजारो नागरिकांना पुराचा फटका बसला असून त्यांच्या मदतीसाठी लष्कर, नौसेना,  एनडीआरएफ सज्ज झाली आहे. (गडचिरोली: पर्लकोटा नदीला मागील 15 दिवसांत तिसर्‍यांदा पूर; 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटल्याची भीती)

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आज (8 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. पूरग्रस्तांची विचारपूस करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. तर काल (7 ऑगस्ट) कॅबिनेट बैठक घेत आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.