Maharashtra Monsoon Update 2019: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Wikimedia Commons)

पावसाचा जोर मुंबईत ओसरला असला तरीही महाराष्ट्रातील पुणे, सांगली, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. पावसाचा जोर पुढील 3 दिवस कायम राहणार असून महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD च्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 9 ऑगस्टला या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर 11 ऑगस्टपर्यंत कायम राहील असा असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

त्याचबरोबर ठाणे आणि मुंबईतही पुढील 2-3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाचा हा जोर या भागातही पुढील 2-3 दिवस कायम राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे.

के एस होसाळीकर ट्विट

के एस होसाळीकर ट्विट

दुसरीकडे कोल्हापूर, सांगली शहराला मागे काही दिवसांपासून जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता कृष्णा नदी, राधानगरी धरणातील पाण्याने धोक्याची पातळी पार केल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने स्थिती अधिकच बिकट झाली आहे. पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा दिल्या कारणाने आजही कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आजही सुट्टी देण्यात आली आहे.

ANI चे ट्विट:

त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पुराचा फटाका तेथील वीजवितरणाला बसला असून कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 783 आणि सांगली जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 822 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

हेही वाचा- रायगड, कोल्हापूर,सातारा, सांगली मध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीचे; पुणे शहरात 137% पाऊस

कोल्हापूर, सांगली शहराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आता पुरात अडकलेल्यांची सुटका एअरलिफ्टच्या सहाय्याने करण्यासाठी प्रशासन सज्ज असून युद्ध पातळीवर त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरु आहे. यात लष्कर, नौसेना मदत करत आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर, पाणबुडी सज्ज ठेवण्यात आली आहे.