काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. एका मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींबाबत हे वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दीक युद्धाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. यामुळे आता महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) थीणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
" राहुल गांधी आमचे नेते आहेत. त्यांचे काँग्रेस पक्षाने नेतृत्व स्वीकारले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. ते त्यांच्या जीवनात अनेक दु:खांना समोरे गेले आहेत. तसेच त्यांच्यावर जे आघात झाले आहेत, त्यातूनही सावरत ते पक्षाचे नेतृत्व करत आहेत. एवढेच नव्हेतर, राहुल गांधी पुढील काळात पक्षाचे समर्थपणे पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतु, ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते." असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. हे देखील वाचा- Farmers Protest: कृषी कायदा रद्द होणार नाही; चंद्रकांत पाटील यांचे शरद पवार यांना थेट उत्तर
आघाडी मधील काही नेयांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, अशा आशयाचे ट्विट काँग्रेस नेत्या आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.