LPG Cylinder: एलपीजी सिलेंडर वजनात घट करण्याचा केंद्र सरकारचा विचार
LPG Cylinder Price Hike (Photo Credits: ANI)

घरगुती गॅस सिलिंडर (LPG Cylinder) वजन कमी केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यावर विचार करत आहे. शारीरिक ताकत कमी असलेल्या देशभरातील अनेक महिला अधिक वजनाचे घरगुती सिलिंडर उचलू शकत नाही. ते सिलेंड एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांचा त्रास काहीसा कमी करण्यासाठी केंद्र सरकार सिलिंडरचे वजन (Gas Central Weight) कमी करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, सिलिंडरचे वजन कमी केल्यांतर त्याचे दरही वजनाप्रमाणे कमी होणार की ते हळूहळू वाढतच राहणार आणि सिलेंटरचे वजन घटत राहणार याबाबत पुरेशी स्पष्टता होऊ शकली नाही.

घरगुती सिलेंडर गॅस (एलपीजी) चे वजन आजघडीला 14.2 इतके असते. हे सिलिंडर उचलताना अनेक महिलांना अधिक शक्ती वापरावी लागते. अशा वेळी या अडचणी कमी करुन सिलिंडरची वाहतूक करणे अधिक सोपे व्हावे. तसेच, महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार उपयोजना करण्याचा विचार करते आहे. पेट्रोलियम एवं प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांदरम्यान विचारलेल्या पश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या आधीही त्यांनी सिलिंडर वजनामुळे महिलांना होत असलेल्या त्रासाबद्दल संसदेत माहिती दिली होती. (हेही वाचा, LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ; आजपासून लागू होणार नवे दर)

पुरी यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, महिला आणि मुलींना अधिक वजनाचे सिलिंडर उचलावे लागू नये ही आमची आपेक्षा आहे. त्यामुळे सिलिंडरचे वजन कमी करण्याबाबत आम्ही विचार करतो आहोत. आम्ही एक मार्ग निवडत आहोत. 14.2 किलोग्रॅम वजनावरुन सिलेंटर पाच किलोग्रॅमवर आणण्याचा आमचा विचार आहे. किंवा इतरही काही मार्ग निवडले जातील. संसदेमध्ये गोंधळ सुरु असताना हरदीप पुरी यांनी ही माहिती दिली. संसदेतील 12 निलंबीत सदस्यांच्या निलंबनावरुन विरोधक आक्रमक असताना त्यांनी प्रश्नाला उत्तर दिले.