मशिदींवरील भोंग्यावरुन मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील (Mosques) भोंगे (Loudspeaker) उतरवण्याबद्दल मनसेने सुरु केलेले आंदोलन (Loudspeaker Row In Maharashtra) केवळ एक दिवसाचे नाही. जोपर्यंत हे भोंगे अनधिकृतपणे आणि नियमबाह्य वाजत राहतील तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन कायम ठेऊ. आमचा मशिदींवरील भोंग्यांना अथवा कोणाच्या धार्मिक कार्यक्रमांना विरोध नाही. आमचा मुद्दा सामाजिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियम, अटींची पूर्तता करुन हे भोंगे लावण्यात यावेत. आमचा मुद्दा धर्मिक नाही. तो सामाजिक आहे. असे असताना त्याला धार्मिक वळण देऊन जर कोणी उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला धार्मिक वळणानेच उत्तर देऊ, असेही राज ठाकरे म्हणाले. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी दावा केला की, राज्यात आज जवळपास 90 ते 91 टक्के मशिदींमध्ये आजान झाली नाही. याबद्दल त्यांनी मशिदींतील मुल्ला,मौलविंचे आभार मानले. ते म्हणाले आमचा विषय त्यांना कळला. त्यांनी भोंग्यांवर आजान केलीनाही. दरम्यान, मुंबईमध्ये 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींवरील आजान सकाळी पाच वाजण्यापू्र्वी लावण्यात आली आहे. या मशिदींवर राज्य सरकार काय कारवाई करणार आहे? की केवळ मनसे कार्यकर्त्यांवरच पोलीस कारवाई करणार आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला. आमच्या हिंदू सणांना भोंगे लावायला काही दिवसांची परवानगी मिळते. मशिदींवर भोंगे लावायला मात्र 365 दिवसांची परवानगी कशी मिळते? आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली भडकवायच्या नाहीत. आमचा मुद्दाच मुळी सामाजिक आहे, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Politics of Maharashtra: राज ठाकरे यांच्या राजकारणाचे सूत्र, विरोधकांशी कधी जवळीक, कधी प्रहार; घ्या जाणून)
आमचा मुद्दा राजकीय अथवा श्रेयवादाचा नाही हे स्पष्ट करत राज ठाकरे म्हणाले, जे मंदिर, मशिदी असतील त्यांवरील अनधिकृत भोंगे खाली आलेच पाहिजेत. आमचा विषय हा केवळ सकाळच्या आजानपूरता मर्यादित नाही. दिवसभरात मशिदिंमध्ये ज्या ठिकाणी चार ते पाच वेळा आजान होते त्याही बंद झाल्या पाहिजेत नाहीतर आमचे लोक मशिंदींसमोर भोंगे लावणार म्हणजे लावणार.
It's not only about mosques, there are several temples where illegal loudspeakers are running. I have already made it clear that it's (illegal loudspeakers) not a religious issue but a social issue: MNS chief Raj Thackeray pic.twitter.com/mALQFfy0WF
— ANI (@ANI) May 4, 2022
मुबईमध्ये अनेक मशिदी अनधिकृत आहेत. त्यामुळे सहाजिकच अनधिकृत मशिदींवरील भोंगेही अनधिकृत आहेत. तरीही राज्य सरकार त्या भोंग्यांना अधिकृत परवानगी देते. खरे म्हणजे राज्य सरकारची ही भूमिका अत्यंत आश्चर्यकारक आणि कल्पनेपलीकडची आहे. आम्ही पुन्हा सांगतो की, आमचा मुद्दा धार्मिक किंवा राजकीय नाही. आमचा मुद्दा सामाजिक आहे. त्यामुळे हा विषय एक दिवसांचा नाही. राज्य सरकारने तो समजून घ्यावा. आम्ही सामाजिक मुद्द्यावर बोलतो आहे. या मुद्द्याला जर त्यांनी धार्मिक वळण दिले तर आम्ही त्याला धर्मिक उत्तर देऊ.