Lok Sabha Elections 2019: पार्थ पवार यांचा बालेकिल्ला राज ठाकरे लढवणार? अजित पवार यांनी दिले संकेत
Raj Thackeray and Parth Pawar (Photo Credits-Facebook)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुक आपण लढवणार नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध राज्यात सभा घेणार असल्याचे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. तसेच राज्यात 6-7 ठिकाणी सभा घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. तर मावळ येथील पार्थ पवार (Parth Pawar) यांचा बालेकिल्ला राज ठाकरे लढवणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर यावर अजित पवार (ajit Pawar) यांनी संकेत दिले आहेत.

पार्थ पवार हे प्रथमच आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असून त्यांना मावळ (Maval) मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार मनसेच्या व्यासपीठावरुन करणार असल्याचे सुद्धा म्हटले होते. त्यामुळे आता खुद्द राज ठाकरे पार्थ पवार यांचा बालेकिल्ला लढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तर पार्थ पवार यांना मावळ येथे टक्कर देण्यासाठी शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे पहिल्या टप्प्यासाठी साताऱ्यासह अन्य 6 ठिकाणी 14 एप्रिल पासून घेणार प्रचारसभा)

तत्पूर्वी अजित पवार यांनीसुद्धा राज ठाकरे यांची प्रचारसभा मावळ येथेसुद्धा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे येऊन उमेदवार असल्याचा अभिमान बाळवगून पार्थ पवार यांना निवडणून देण्याचे भावनिक आवाहन अजित पवार यांनी केले आहे.