Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे पहिल्या टप्प्यासाठी साताऱ्यासह अन्य 6 ठिकाणी 14 एप्रिल पासून घेणार प्रचारसभा
लोकसभा निवडणुकीची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.याच पार्श्वभुमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यात 8 ते 10 ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीची तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.याच पार्श्वभुमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यात 8 ते 10 ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर यंदाच्या पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे पहिल्या टप्प्यातील प्रचारसभा कुठे घेणार याबद्दल त्यांनी सांगितले नव्हते. मात्र आता येत्या 14 एप्रिल पासून राज ठाकरे साताऱ्यासह अन्य 6 ठिकाणी आपल्या प्रचारसभा घेण्यास सुरुवात करणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मतदार संघासाठी राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या दिवशी जोरदार टीका केली. त्यामुळेच मोदीमुक्त भारत आणि भाजप पक्षाच्या विरोधात राज ठाकरे आपल्या प्रचारसभा घेणार आहेत. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सुद्धा कराड येथे राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात प्रचारसभा घेणार, सूत्रांनी दिली माहिती)
14 एप्रिल: नांदेड
15 एप्रिल: सोलापूर
16 एप्रिल: इचलकरंजी
17 एप्रिल: कराड
18 एप्रिल: खडकवासला
19 एप्रिल: पेण किंवा अलिबाग
तर राज ठाकरे यांची सभा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या मतदार संघासाठी प्रचारसभा घेणार आहेत. तसेच 23 एप्रिल रोजी पुण्यात मतदान होणार असल्याने पहिल्या टप्प्यातील सभा राज ठाकरे 18 एप्रिल रोजी घेणार आहेत. त्याचसोबत मावळ मतदार संघातून तिकिट देण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्यासाठी सुद्धा प्रचार सभा घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2019 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

