Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे विरोधकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिल्ली येथे उद्याच (मंगळवा22 जून 2021) दुपारी चार वाजता पार पडत आहे. शरद पवार आणि प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात एक बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी एक बैठक बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. देशातील कोरोना स्थितीमुळे ही बैठक सुरुवातीला व्हर्च्युअली पार पडणार होती. परंतू, ही बैठक आता प्रत्यक्षात पार पडत आहे. कोरोना स्थितीत विरोधकाची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक असणार आहे.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. ही बैठक राष्ट्रमंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचे समजते. या बैठकीस साधारण 15 राजकीय पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेत तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाला या बैठकीचे निमंत्रण नसल्याचे समजते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही काँग्रेस महासचिव आणि राज्य प्रभारी तसेच प्रदेशाध्यक्षांची एक बैठक बोलावली आहे. ही बैठक येत्या 24 जून रोजी पार पडत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: शरद पवार, प्रशांत किशोर यांच्यात दिल्ली येथे भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान; विरोधकांचे मिशन 2024?)

एएनआय ट्विट

भविष्यात युपीएला वगळून एनडीएविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच, तिसऱ्या आघाडीचा चेहार ममता बॅनर्जी यांना बनवला जाईल व शरद पवार हे तिसऱ्या आघाडीचे संयोजक असतील अशी चर्चा आहे. यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये राष्ट्र मंच स्थापन केला. कोणत्याही राजकीय वाटचालीबाबत राष्ट्रीय मंचने अद्याप तरी घोषणा केली नाही. परंतू, भविष्यात एखादी राजकीय घोषणा होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणने आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात सोमवारी (21 जून) पुन्हा एकदा भेट झाली. अवघ्या 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. पवार आणि किशोर यांच्यात दिल्ली येथे ही भेट झाली. या भेटीचा हवाला देत प्रसारमाध्यामांमध्ये चर्चा आहे की, विरोधकांनी मिशन 2024 हाती घेतले असून त्या दृष्टीने राजकीय रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. असेही बोलले जात आहे की, लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवार हा चेहरा विरोधकांकडून मैदानात उतरवला जाऊ शकतो. त्यामळे प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या पवार यांच्या चर्चेला अधिक महत्त्व आले आहे.