Lockdown काळात राज्यमंत्री बच्चू कडू यांचा मोठा निर्णय; गोरगरिबांना 2 रुपयात देणार जेवण
State Minister Bachchu Kadu (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) लॉक डाऊन (Lockdown) काळात अनेक राजकीय मंडळींनी पुढाकार घेऊन गोरगरिबांसाठी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये स्थलांतरितांना निवासाची सोय करून देण्यापासून ते गरजू व गरिबांना अन्न पुरवण्यापर्यंत अनेक कामे विविध स्तरावर केली जात आहेत. राज्य सरकारच्या मदतीसोबतच स्वतःच्या खर्चाने ही कामे केली जात आहेत, याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे. लॉक डाऊन काळात बच्चू कडू हे गरिबांना अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलब्ध करून देणार आहेत. महाराष्ट्र: नंदुरबार शहरामध्ये आढळला पहिला कोरोनाबाधित रूग्ण; 20 एप्रिल पर्यंत वैद्यकीय सेवा वगळता इतर आस्थापनं बंद

प्राप्त माहितीनुसार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 16 एप्रिल रोजी संत गाडगे बाबा रोटी अभियानाअंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये गोरगरिंबासाठी अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलब्दध करून दिलं आहे. दररोज 800 जण या योजनेचा लाभ घेतात. चिखलदरा स्टॉप रेस्ट हाऊस परतवाडा येथे सकाळी 9  ते 11 या वेळेत जेवण उपलब्ध आहे.Coronavirus Outbreak in India: भारत देशात एकूण 14,378 कोरोना बाधित तर 480 रुग्णांचा मृत्यू.  

बच्चू कडू पोस्ट

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम शिवभीजन थाळी संदर्भात सुद्धा काही निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार, आतापर्यंत 10 रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळीआता केवळ 5 रुपयांना मिळणार आहे. तसेच प्रतिदिन शिवभोजन थाळ्यांची उपलब्ध संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. सद्य घडीला महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 205 वर पोहचली आहे. यात 194 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 300 रुग्ण रिकव्हर झाले आहेत.