कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतर होत आहेच. परंतू, प्रामुख्याने परप्रांतीय मजूर, कामगार यांचे स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन (Lockdown) हटवल्यानंतर उद्योग, व्यवसाय सुरु करायचा तर मजूर, कामगार वर्गाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासणार आहे. अशा स्थिती कोणताही व्यवसाय, काम कमी दर्जाचे न मानता मराठी मुलांनी ही पोकळी भरून काढावी, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे ही भावना व्यक्त केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी ट्विटरमध्ये काय म्हटले आहे?
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''लॉक डाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा व आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये''.
पुढच्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ''एकेकाळी व्यवसायाकडे लाजत-बुजत पाहणारे आज वाजत-गाजत व्यवसाय करतायेत. चहा, भाजी, फळं विक्री, टॅक्सी, प्लंबर, होम डिलिव्हरी, टेलरिंग, इलेक्ट्रिशियन इत्यादी व्यवसाय करण्यास आता लाजत नाहीत. कोणताही व्यवसाय छोटा/मोठा नसतो तर सचोटीने आणि प्रामाणिकपणे केला तर माणसाला मोठा करणारा असतो''.
रोहित पवार ट्विट
एकेकाळी व्यवसायाकडे लाजत-बुजत पाहणारे आज वाजत-गाजत व्यवसाय करतायेत. चहा, भाजी, फळं विक्री, टॅक्सी, प्लंबर, होम डिलिव्हरी, टेलरिंग, इलेक्ट्रिशियन इत्यादी व्यवसाय करण्यास आता लाजत नाहीत. कोणताही व्यवसाय छोटा/मोठा नसतो तर सचोटीने आणि प्रामाणिकपणे केला तर माणसाला मोठा करणारा असतो. https://t.co/z7WjHlZpAM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2020
आणखी एका ट्विटमध्ये रोहित पवार यांनी आपल्या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद दिल्याचे सांगत म्हटले आहे की, ''या tweet नंतर अनेकांनी फोन करून मला हे सांगितलं. नवीन पिढीत होत असलेल्या याच बदलाची आज गरज आहे. समोर संकटाचा डोंगर असला तरी त्यातून संधीची वाट काढता आली पाहिजे & माझे मराठी बांधव ही वाट काढतायेत, हे ऐकून आनंद वाटला. मित्रांनो तुम्ही लढत रहा.. मी सोबत आहे''. (हेही वाचा, महाराष्ट्र: स्थलांतरीत कामगारांचा मुंबई-नाशिक महामार्गाने पायीच घर गाठण्याचा प्रयत्न; पैशाअभावी प्रवासादरम्यान लहान मुलांसह मजूरांची खायची आबाळ)
आमदार रोहित पवार ट्विट
या tweet नंतर अनेकांनी फोन करून मला हे सांगितलं. नवीन पिढीत होत असलेल्या याच बदलाची आज गरज आहे. समोर संकटाचा डोंगर असला तरी त्यातून संधीची वाट काढता आली पाहिजे & माझे मराठी बांधव ही वाट काढतायेत, हे ऐकून आनंद वाटला. मित्रांनो तुम्ही लढत रहा.. मी सोबत आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2020
लॉकडाऊनमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरात न भुतो न भविष्यती स्थिती निर्माण झाली आहे. घराबाहेर पडायचे तर कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट. घरात थांबायचे तर लॉकडाऊन. हाताला काम नाही. जवळ होती तेवडी पुंजी आणि अन्नधन्यासाचा साठाही संपला. त्यामुळे खायला अन्न नाही. अशा विशन्न मनाने स्थलांतरीत कामगार स्वगृही परतत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कामगारांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.