आंबेनळी घाटाच्या लगत डोंगराचा भाग कोसळला, पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान वाहतूक बंद
landslide in Ambenali Ghat section (Photo Credits: ANI)

महाबळेश्वर : महाराष्ट्रात मागील दोन दिवसात पावसाने घातलेल्या थैमानानंतर कुठे रस्ता खचल्याने तर कुठे दरड कोसळल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आजही रायगड (Raigad) व सातारा (Satara) जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटात (Aambenali Ghat Section)  डोंगराचा काही भाग रस्त्यावर कोसळल्याचे समजत आहे. यामुळे पोलादपूर (Poladpur) व महाबळेश्वर (Mahabaleshwar)  दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. Maharashtra Monsoon 2019 Forecast: रायगड, ठाणे परिसरात पुढील दोन दिवस पुन्हा अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा अंदाज

ANI ट्विट

दरम्यान, हा कोसळलेला भाग रस्त्यावरून हटवण्यात वेळ लागणार असून तोवर वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी उपल्बध नसेल.