Maharashtra Monsoon 2019 Forecast: रायगड, ठाणे परिसरात पुढील दोन दिवस पुन्हा अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा अंदाज
Monsoon (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईसह ठाणे, पालघर, कोकण भागात दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून धरणांनीदेखील धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्रामध्ये सक्रिय असलेला मान्सून पुढील काही दिवसदेखील दमदार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असून रायगड, ठाणे परिसरात मात्र पुढील काही दिवस अतिवृष्टीचे असू शकातात. 6 ऑगस्ट दिवशी रायगड तर 7 ऑगस्ट दिवशी रायगडसह ठाण्यातही जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. Mumbai Rains Forecast: मुंबईमध्ये आज दमदार सरी कोसळण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई सह पश्चिम किनारपट्टीवर मागील काही महिन्यांपासून दमदार पावसाची बरसात सुरू आहे. हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहणार आहे. पावसाचा ऋतू पूर्ण झाला आहे. यामध्येच सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मंकी हिल दरम्यान मोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

 

ANI Tweet

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 100% पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.