प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीवर ही झाला असून लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील मंकी हिल दरम्यान मोठी दरड कोसळी आहे. या प्रकारामुळे वाहतूकसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस वाहतुक सुरळीत होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सकाळी मंकी हिल दरम्यान मोठी दरड कोसळ्याची घटना घडला आहे. यामुळे मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे दरड कोसळी असून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद पडली आहे. दरड कोसळ्याने रेल्वे मार्गावर मातीचे ढिगारे साचले आहेत. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.(Mumbai Railway Update: मुंबईची 'लाईफलाईन' हळूहळू पूर्वपदावर, मात्र कर्जत-कल्याणसह या मार्गांवरील लोकलसेवा पूर्ववत होण्यास मंगळवार उजाडण्याची शक्यता)

यापूर्वीसुद्धा मुंबई-पुणे मार्गावरील मालगाडीचे डबे रेल्वेरुळांवरुन घसरल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली होती. त्यावेळी मुंबई येथून पुण्याला जाणाऱ्या बऱ्याच गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.