Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना वाढीव रकमेची तरतूद केली जाईल अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. त्यामुळे आता या योजनेंतर्गत प्रति महिना 2100 रुपये केव्हा मिळणार याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. दरम्यान, विद्यमान स्थितीत तर लाभार्थ्यांना प्रति महिना 1500 रुपये मिळत आहेत. राज्याची एकूणच आर्थिक स्थिती पाहता पुढचे आणखी काही महिने तरी, योजनेची हिच स्थिती कायम राहणार असल्याचे चित्र आहे. मग 2100 रुपयांचे काय? हा प्रश्न उपस्थतित होतो, त्यासाठी घ्या अधिक जाणून.

अदिती तटकरे काय म्हणाल्या?

लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana Update) राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून चालवली जाते. या खत्याच्या मंत्री आहेत अदिती तटकरे. त्यांनी विधिमंडळात बोलताना सांगितले की, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या प्रति महिना 1500 रुपये या रकमेत यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ करुन ती 2100 रुपये केली जाईल, असे आम्ही केव्हाच म्हणालो नव्हतो. विधानसभा निवडणुकीत सादर केला जाणारा जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. अदिती तटकरे यांच्या विधानाचा अर्थ असा काढला जात आहे की, राज्य सरकार यंदा नाही पण, पुढे केव्हातरी या योजनेची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार तरी केव्हा? वरुण सरदेसाई यांच्या प्रश्नास आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिले?)

लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास विलंब

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून सुरुवातीचा काही काळ वगळता प्रति महिने मिळणारे सर्व हप्ते वेळत चुकते केले आहेत. अपवाद मात्र फेब्रुवारी 2025 महिन्याचा ठरला. राज्य सरकारने अगाऊ जाहीर करुन देथील या महिन्याचे (फेब्रुवारी 2025) पैसे राज्य सरकारने वेळेत दिले नाहीत. राज्य सरकार शक्यतो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा तो संपण्यापूर्वी हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरण पद्धतीने पाठवत असते. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास जागतिक महिला दिनाचा मुहूर्त उजाडावा लागला. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, 'थोडे थांबा! 2100 रुपयांबाबत काम सुरु आहे')

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना राज्य सरकारने आतापर्यंत हजारो रुपये वितरीत केले आहेत. ज्याची एकत्रिक रक्कम काही लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवरही मोठा आर्थिक भार निर्माण झाला आहे. अशा वेळी राज्य सरकार योजनेचे निकष आणि पात्रता यांवर गांभिर्याने विचार करत आहे. ज्या महिला आणि लाभार्थी या योजनेचे निकष पूर्ण करत नाहीत त्यांना अपात्र करण्याचे धोरण राज्य सरकार अवलंबत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवरा लटकत आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, जवळपास 50 लाख महिलांचे अर्ज या योजनेतून बाद होतील, अशी शक्यता आहे.