Varun Sardesai, Aditi Tatkare | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 205-26 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मदत निधीत वाढीची घोषणा झालीच नाही. सबब राज्य सरकारने विधानसभा निवडणूक 2024 मध्ये दिलेल्या अश्वासनांची पूर्तता केली नाही, असा आरोप करत विरोधकांनी टीका केली. समस्त लाभार्थी महिलांमध्येही मोठी नाराजी आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी राज्य सरकारला तिन महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्यास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी उत्तर दिले.

वरुण सरदेसाई यांनी कोणते प्रश्न विचारले?

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. याच अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 205-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. जवळपास 45 हजार लाख कोटी रुपये आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प सादर झाल्याने राज्य सरकारच्या खर्चावर मर्यादा येणे हे जवळपास निश्चित झाले होते. परिणामी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा विचार केला नसावा असे प्रथमदर्शनी चित्र आहे. त्यावरुनच शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारला तीन प्रश्न विचारले. हे तीन प्रश्न खालील प्रमाणे:

  • प्रश्न पहिला: निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते?
  • प्रश्न दुसरा: निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केलं गेलं?
  • प्रश्न तिसरा: सरकारनं सांगितल्याप्रमाणे महिलांना 2100 रुपये देणार आहात की नाहीत? (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, 'थोडे थांबा! 2100 रुपयांबाबत काम सुरु आहे')

अदिती तटकरे यांनी सांगितली आकडेवारी

वरुण सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2024 निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे 2 कोटी 33 लाख 64 हजार लाभार्थी होते. निवणुकीनंतर फेब्रुवारी 2025 चा हप्ता दिला त्या वेळी लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 47 लाखांहून अधिक आहे. याचाच अर्थ लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. (हेही वाचा, Varun Sardesai: हे सगळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ग्रॅज्युएट, वरुण सरदेसाई यांचा भाजपला टोला)

21 रुपयांचे काय?

अदिती तटकरे यांनी वरुण सरदेसाई यांच्या तिसऱ्या म्हणजेच 2100 रुपये देण्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देताा सांगितले की, लाडकी बहीण योजना महायुतीने आणली आहे. राज्यातील महिलांना या योजनेंतर्गत प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ देणारे हे एकमेव सरकार आहे. हा लाभ महिलांना कायमस्वरुपी मिळत राहिली याबाब काळजी घेतली जाईल. दरम्यान, योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याबाबत राज्याचे मुख्यमत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आवश्यक तो योग्य निर्णय योग्य वेळी घेतील. पण, लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही अदिती तटकरे म्हणाल्या.