Kolhapur Shocker: मुलीने झोपेत बिछाना ओला(Bed Wetting) केल्यामुळे सावत्र आईने मुलीच्या गुप्तांगाला गरम उलथन्याने चटके दिल्याची संतापजनक घटना कोल्हापूरच्या (Kolhapur Crime)हातकणंगले तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पूजा मगरे असे आरोपी सावत्र आईचे नाव आहे. शुभम मोकिंदराव मगरे हे आपली दुसरी पत्नी व 2 मुलांसह हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून राहतात. (हेही वाचा:Beed Shocker: जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले; रात्रभर ओलीस ठेऊन केली मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video) )
शुभम यांना पहिल्या पत्नीपासून एक 5 वर्षांची मुलगी आहे. शुभम शुक्रवारी काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी घरात झोपली होती. ती दुपारी 12 च्या सुमारास झोपेतून उठली. त्यावेळी तिने अंथरुणात लघुशंका केली होती. हा प्रकार तिची सावत्र आई पूजा मगरे हिला सहन झाला नाही. त्यानंतर महिलेने तिला चटके दिले. (हेही वाचा: Nanded Shocker: नांदेड येथे दूषित पाणी पिल्याने 93 लोक रुग्णालयात दाखल, विहीर करण्यात आली सील)
उलथने गरम करून दिले चटके
रागाच्या भरात पूजा यांनी स्वयंपाक घरातील उलथने गरम करून मुलीला तिच्या गुप्तांगासह गाल, ओठ व गळ्याजवळ चटके दिले. या घटनेत पीडित मुलीचा चेहऱ्याला गंभीर इजा झाली. ही घटना घडली तेव्हा या दोघीच घरात होत्या. काही वेळाने शुभम घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी या प्रकरणी पूजा मगरे यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी मुलीने बिछाना ओला केल्यामुळे तिला शिक्षा दिल्याचे सांगितले. त्यानंतर शुभम यांनी थेट शिरोली पोलिस ठाणे गाठून पूजा मगरे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सावत्र आईला ताब्यात घेतले आहे. या अमानवयी घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.