Beed Shocker: जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले; रात्रभर ओलीस ठेऊन केली मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)

निर्जनस्थळी कार थांबवून गुंडांनी वेटरला मारहाण करून, त्याच्या खिशातील 11 हजार हिसकावले. तसेच वेटरच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला रात्रभर कारमध्ये ठेवले.

Beed Shocker: जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले; रात्रभर ओलीस ठेऊन केली मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)
The accused dragged the waiter off for around a kilometre by car in Maharashtra's Beed. (Photo credits: X/@suman_pakad)

महाराष्ट्रातील बीडमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका वेटरला ग्राहकांना जेवणाचे बिल मागणे महागात पडले आहे. अहवालानुसार, काही तरुण महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर वेटरने त्यांना बिल दिले मात्र त्यानंतर ते कारमधून पळू लागले. बिलासाठी वेटर त्यांच्या गाडीला लटकला, त्यानंतर गुंडांनी त्याला कारमध्ये 1 किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

निर्जनस्थळी कार थांबवून गुंडांनी वेटरला मारहाण करून, त्याच्या खिशातील 11 हजार हिसकावले. तसेच वेटरच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला रात्रभर कारमध्ये ठेवले. या घटनेनंतर पीडित तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून, नागरिकांनी न्यायाची मागणी केली आहे. लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढत आहे. (हेही वाचा: Medical Negligence in Latur: लातूरमध्ये रुग्णालयात बाळंतिणीच्या जीवाशी खेळ; प्रसूतीनंतर रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड पोटात ठेवून घातले टाके)

जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).