कोल्हापूर-सांगली मधील पुरग्रस्तांसाठी तुळजापूर तुळजाभवानी संस्थेकडून 50 लाख रुपयांची मदत
Flood (Photo Credits: Twitter)

कोल्हापूर (Kolhapur)-सांगली (Sangli) राज्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचसोबत नागरिकांसह प्राण्यांचेसुद्धा हाल झाले आहेत. राज्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण चिंता व्यक्त करत असून तेथील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर-सांगली येथील पुरग्रस्तांसाठी फंड जमा करण्यात येत असून विविध मार्गाने नागरिकांची मदत केली जात आहे.

आता तुळजापूर तुळजाभवनी संस्थेकडून 50 लाख रुपयांनी मदत पुरग्रस्तांसाठी करण्यात आली आहे. संस्थेकडून करण्यात येणारी मदत ही तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामधील 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाणार आहे. तर 15 लाख रुपयांचे अन्नधान्य हे कोल्हापूरकरांना देण्यात येणार आहे. तसेच 10 लाख रुपये स्थानिक गरज पाहून मदत केली जाणार आहे.(Maharashtra Floods 2019: पश्चिम महाराष्ट्रात पूराने घेतले 43 बळी; सलग 9 व्या दिवशी NDRF कडून बचावकार्य सुरू)

गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डी साई संस्थानेसुद्धा पुरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. कोल्हापूर-सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो-करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत स्थानिक नागरिकांना त्यांच्या परिवारातील सदस्यांना या पुरात गमवावे लागले आहे. महाराष्ट्रात घडलेला हा प्रकार न पाहण्यासारखा असून राजकरण्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण मदतीचे हात पुढे करत आहेत.