Maharashtra Floods 2019: पश्चिम महाराष्ट्रात पूराने घेतले 43 बळी; सलग 9 व्या दिवशी NDRF कडून बचावकार्य सुरू
Kolhapur Flood (Photo Credits: Twitter)

मागील आठवड्याभरापासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागात पावसाने घातलेल्या धुमाकुळानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात बळींची संख्या 43 वर पोहचली आहे. तर 3 जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 4,74,226 लोकांना विस्थापित केलं आहे. यामध्ये 584 गावांचा समावेश आहे. तर 596 तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत. Konkan Rain: कोल्हापूर, सांगलीला सरकारने दिला मदतीचा हात, तर कोकणातील पूरस्थितीकडे सरकारने फिरविली पाठ, कोकणवासियांमध्ये नाराजीचा सूर

ANI Tweet 

Maharashtra: Death toll due to flood in all five districts of Pune division (Sangli, Kolhapur, Satara, Pune, and Solapur) rises to 43. 3 still missing. 4,74,226 people have been evacuated from 584 villages. 596 temporary shelter camps have been set up for evacuated people. pic.twitter.com/JAB3vjR93g

— ANI (@ANI) August 13, 2019

कोल्हापूरात पाणी ओसरल्यानंतर आता वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. काल सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तसेच लोकांसोबत प्राण्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कामं प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे.