नाशिक (Nashik) कडून विधिमंडळाकडे येणारा शेतकर्यांचा मोर्चा आता ठाणे शहराच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. 20 शेतकर्यांचं 'लाल वादळ' मुंबईतकडे येत असताना आता त्यांच्याशी बोलण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्याकडून दादा भुसे आणि अतुल सावे या दोन मंत्र्यांना धाडलं आहे. हे दोन्ही मंत्री शेतकर्यांच्या भेटीला जाणार आहेत. शेतकरी त्यांना भेटणार नाहीत तर सामान्य नागरिक सत्ताधार्यांना झुकवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्र्यांनी आपल्याला भेटावं असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान दादा भुसे यांनी सरकार 14 मागण्यांवर चर्चा करत असल्याची माहिती दिली आहे. आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार होती मात्र ती रद्द झाली आहे. शेतकरी नेते यांनी या रद्द झालेल्या बैठकीवर संताप व्यक्त करत आता आम्ही मुंबई मध्ये दाखल होणार असं सांगितलं आहे. पण मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे या मधून काही सकारात्मक चर्चा घडवून आणत त्तांच्या समस्यांचं समाधान करणार का? याकडे सार्यांचं लक्ष लागलं आहे. नक्की वाचा: Farmers March Maharashtra: शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'लाल वादळ' मुंबईच्या दिशेने .
पहा ट्वीट
Maharashtra | Farmers delegation met CM Eknath Shinde today with their 14 points demand. CM and Dy-CM both were present in the meeting. CM and Dy-CM have suggested that Atul Save and I will meet the protesting farmers: State Minister Dada Bhuse
(File pic) pic.twitter.com/2ePdwoMk6c
— ANI (@ANI) March 15, 2023
अखिल भारतीय किसान सभेचा लॉंग मार्च माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मुंबई कडे येत आहे. राज्याचं विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हे शेतकरी पायी चालत सुमारे 180 किलोमीटरचा प्रवास करत मुंबईकडे निघाले आहेत.
सरकारकडून वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना बाबत होणारी दिरंगाई, गारपीटग्रस्तांना मदतीबाबत सुरु असलेली उपेक्षा यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले आहे.