Nashik Long March: शेतकरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवाज उठवत पुन्हा एकदा लाल वादळ (Red Storm) मुंबईच्या दिशेने सरकारत आहे. नाशिक येथून साधारण साडेचार वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकरी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. यातापर्यंत या मोर्चाने 66 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. सलग तीन दिवस पायी चालत हा लॉन्ग मार्च (Long March) घोटी (Ghoti) शहरापर्यंत दाखल झाला आहे. अल्पभूधारक, फाटके आणि सर्वसामान्य शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. सलग चालत राहिल्यामुळे मोर्चेकऱ्यांच्या पायांना सुज आली आहे. अनेकांच्या पायांना फोड आले आहेत. फोड फुटल्याने जखमाही झाल्याचे पाहायला मिळत आहे.हा मोर्चा थेट विधानभवनावर धडक देणार आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सकारही अनेकदा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करते, आश्वासनेही देते. काहीच योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात. क्वचितच अश्वासनांची पूर्तता होते. अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात शेतकऱ्यांना पुन्हा आहे त्याच प्रश्नांशी लढावे लागते. कधी कधी त्या प्रश्न आणि समस्यांमध्ये वाढच होते. पण प्रश्न निकाली निघायचे नाव नसते. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचेही सतत्याने कोसळत असलेले भाव शेतकऱ्यांच्या अडचणींचे कारण ठरत आहेत. राज्यातील राजकारणी त्यांना हवा तेव्हा सत्ताबदल करुन जनतेला गृहीत धरत आहेत. त्यामुळे सरकारं बदलतात. परिस्थितीती तिच राहते. प्रशासनही जागा सोडायला तयार नसते. अशा वेळी शेतकऱ्यांनी प्रश्न मांडायचे तरी कोणाकडे? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, दिंडोरी येथून निघालेला लॉन्ग मार्च आता घोटी शहरापर्यंत पोहोचला आहे. मार्चने काल नाशिक शहराजवळी आरोग्य वित्रान विद्यापीठात मुक्कामी होता. आता हा मोर्चा पुढे निघाला असून घोटी शहरापर्यंतचे सुमारे 66 किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर कापले आहे. मार्चचा आजचा सलग तिसरा दिवस आहे.सायंकाळ होताच आजचा मोर्चा घोटी शहराजवळ विसावणार आहे. उन,वारा, पाऊस आणि पायाखाली तापलेली जमीन याचा काहीही विचार न करता हे पाय मुंबईच्या दिशेने पावले टाकत आहेत.
ट्विट
#WATCH | Thousands of Maharashtra farmers march towards Mumbai from Nashik to draw the government's attention towards the various problems faced by them pic.twitter.com/BO1sXYjVSL
— ANI (@ANI) March 14, 2023
या पूर्वीही साधारण साडेचार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघालं होतं. आताही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. दरम्यान, मोर्चाचा पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात एक बैठक होणार होती. मात्र, ती काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे समजते.