Kerala Education Pattern in Maharashtra: महाराष्ट्रात शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार ' केरळ पॅटर्न' राबवण्याच्या विचारात
Education | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटानंतर शिक्षणाचा स्तर खालावला आहे. त्यामुळे यामध्ये मोठे बदल करण्यासाठी आता सरकार शिक्षण व्यवस्थेमध्ये 'केरळ पॅटर्न' (Kerala Education Pattern) राबवण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे. केरळ (Kerala) सोबत राजस्थान (Rajasthan) आणि पंजाब (Punjab) या राज्यातील शिक्षणातील पॅटर्न मधील यशस्वी प्रयोग देखील राबवले जाणार आहेत.

शिक्षण व्यवस्थेमध्ये केरळ पॅटर्न लागू झाला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. हळूहळू त्याच्या पुढील वर्गांमध्येही या परीक्षा घेण्यात येणार आहे.

केरळ पॅटर्न मध्ये प्राथमिक शाळा चालवण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना असतो तर माध्यमिक शाळा चालवण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला दिला जातो. यामध्ये दर महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा होते. कमी गुण असलेल्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळते. अभ्यासक्रमामध्येही दर 10 वर्षांनी बदल केले जातात. लेखकाला प्रोत्साहन दिले जाते, कला, विज्ञान मेळावे घेतले जातात. प्रत्येक शाळेत शिक्षक आणि पालकांचे असोसिएशन असते. नक्की वाचा:  4-year UG Programmes From 2023-24: आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीचा अभ्यासक्रम 4 वर्षांचा

केरळ पॅटर्नमध्ये मातृभाषेतील शिक्षणाला देखील प्रोत्साहन दिले जाते. आता त्याचे प्रयोग महाराष्ट्रातही वाढवले जणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचंओझं देखील कमी करण्यासाठी आता वह्यांची पानं पुस्तकाला जोडण्यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. पुस्तकं देखील 3-3 महिन्यांची  उपलब्ध करून दिली जाणार आहेत.