Karad: Old Krishna Bridge flooded (Photo Credits-Twitter)

सध्या राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखोल भागात पाणी साठल्याचे दिसून आले होते. तर कराड (Karad) येथील कृष्णा नदीला (Krishna River) आलेल्या पुरामुळे जुना पूल वाहून गेला आहे. यामध्ये कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर गेल्या आठवड्यात हा पुल बंद करण्यात आला होता.

कृष्णा नदीवर असलेला जुना पूल काही बंद करण्यात आला होता. तर नदीला पूर आल्याने हा बंद करण्यात आलेला पुल आज दुपारी 3.30 वाजता वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.(मुंबई: टाटानगर येथील विद्यार्थी दररोज पार करताहेत मृत्यूचा सापळा; पाहा अंगावर रोमांच उभे करणारा व्हिडिओ)

तर गेल्या महिन्यात रत्नागिरी येथील तिवरे धरण फुटून 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारावर खेकड्यांनी भोक पाडल्याने धरण फुटल्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर सावंत यांच्या विधानावर संताप व्यक्त केला गेला.