मुंबई: टाटानगर येथील विद्यार्थी दररोज पार करताहेत मृत्यूचा सापळा; पाहा अंगावर रोमांच उभे करणारा व्हिडिओ
Mumbai: TataNagar Building (Photo Credits-TOI/Sanjay Hadkar)

मुंबईत सध्या इमारती कोसळून अनेक जणांनी आपले जीव गमावल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच घडल्या आहेत. तर प्रशासनाकडून धोकादायक असलेल्या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात आता मुंबईतील (Mumbai) टाटानगर (TataNagar) येथील एका चार इमारतीची अवस्था सुद्धा अशीच असून त्याच्या काही भागाची पडझड झाली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज या धोकादायक इमारतीमधून वाट काढत पुढे जावे लागत आहे. याचा थराराचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, टाटानगर येथील चार मजली इमारतीची अवस्था अंत्यत दुर्दशा झाली असून त्याचा काही भाग कोसळला आहे. तरीही या इमारतीमधील नागरिक आणि शाळकरी मुले या धोकादायक भागातून मार्ग काढत पुढे जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायर होत असून ही एक गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे.

तर व्हायर झालेल्या व्हिडिओत शाळकरी मुले आपला जीव मुठीत धरुन या धोकादायक इमारतीवरुन मार्ग काढत पुढे जात आहेत. तसेच एक व्यक्ती या मुलांना पुढे जाण्यासाठी हातभार लावताना दिसून येत आहे.(मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटल जवळील नंद विलास इमारतीचा काही भाग कोसळला; एकजण जखमी)

इमारत कोसळण्याचे प्रकार समोर आले तरीही अद्याप त्यावर काही ठोस पावले उचलली गेली नाहीत. तर काही दिवसांपूर्वी डोंगरी येथील चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता टाटानगर मधील या धोकादायक इमारतीकडे प्रशासन कधी लक्ष देणार याची चिंता व्यक्त केली जात आहे.