Image used for Representational Purpose | (Photo Credits: ANI)

मुंबईतील मौलाना शौकत अली रोडवरील (Maulana Shaukat Ali Road) जे. जे. हॉस्पिटल (JJ Hospital) जवळील नंद विलास इमारतीचा (Nand Vilas Building) काही भाग कोसळ्याची धक्कादायक घटना आज (28 जुलै) पहाटे 4 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. इमारत जुनी अल्याने रिकामी करण्यात आली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.

ANI ट्विट:

मुसळधार पावसामुळे मुंबई सह राज्याच्या अनेक भागात इमारत, स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील डोंगरी परिसरातील काही भाग कोसळ्याने दुर्घटना घडली होती. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले होते. तर गोवंडी येथे देखील इमारत कोसळल्याने 8 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. वांद्रे येथे घराचा स्लॅब कोसळून 2 जण जखमी झाले होते. (Dongri Building Collapse Updates: 'बी' वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांचं निलंबन; डोंगरी दुर्घटनेवर मुंबई महापालिकेची पहिली कारवाई)

केवळ मुंबईतच नाही तर राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे इमारत, स्लॅब कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.